Vida VX2 Go Details: भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात ग्राहकांची पसंती आता वेगाने बदलत असून Hero Vida च्या इलेक्ट्रिक स्कूटर्सनी विक्रीच्या बाबतीत नवा उच्चांक गाठला आहे. ऑगस्ट २०२६ मधील अधिकृत आकडेवारीनुसार, Hero Vida च्या स्कूटर्सच्या विक्रीत तब्बल १०८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
गेल्या वर्षी याच काळात हीरो विडा ने १२,२७३ युनिट्सची विक्री केली होती. मात्र, यंदा ही संख्या थेट दुपटीपेक्षा जास्त वाढून २५,५५८ युनिट्सवर पोहोचली आहे. या विक्रमी कामगिरीमुळे बजाज चेतक (Bajaj Chetak) आणि टीव्हीएस आयक्यूब (TVS iQube) नंतर हिरो विडा ही देशातील तिसरी सर्वाधिक विकली जाणारी ई-स्कूटर ठरली आहे.
Vida VX2 Go: खिशाला परवडणारी किंमत आणि दमदार रेंज
हीरो विडा च्या पोर्टफोलिओमधील Vida VX2 Go हा सर्वसामान्यांना परवडणारा पर्याय ठरत आहे. कंपनीने यामध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार बॅटरीचे तीन पर्याय दिले आहेत:
- 2.2 kWh
- 3.1 kWh
- 3.4 kWh
यातील 2.2 kWh बॅटरी व्हेरियंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अवघी ₹79,999 (दिल्ली एक्स-शोरूम) आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, हे बेस मॉडेल सिंगल चार्जमध्ये ९३ किमीपर्यंतची क्लेम्ड रेंज देते. दैनंदिन ऑफिस, कॉलेज किंवा स्थानिक कामांसाठी ही रेंज चांगलीच म्हणावी लागेल.
₹1 मध्ये 4 किमीच गणित?
सध्या वाढत्या पेट्रोलच्या दरात इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे रोजचा खर्च वाचवणे. Hero Vida च्या बाबतीत हा खर्च पेट्रोलच्या तुलनेत परवडणारा आहे:
- फुल चार्जचा खर्च: जर घरगुती वीजदर सरासरी ₹8 प्रति युनिट धरला, तर 2.2 kWh ची बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी अवघा ₹१८ ते ₹२० खर्च येतो.
- प्रति किलोमीटर रनिंग कॉस्ट: ₹२० च्या चार्जिंगमध्ये गाडी अंदाजे ८० ते ९० किमी धावते. म्हणजेच प्रति किलोमीटरचा खर्च सुमारे २५ पैसे येतो.
- थोडक्यात सांगायचे तर: पेट्रोलवर जिथे १ किलोमीटरसाठी २ ते २.५ रुपये खर्च होतात, तिथे Vida VX2 Go १ रुपयात जवळपास ४ किलोमीटर अंतर पार करते!
(टीप: प्रत्यक्ष प्रति किमी खर्च हा – रेंज, रायडिंग स्पीड, प्रति युनिट वीजदर आणि रस्त्याची स्थिती यानुसार थोडाफार बदलू शकतो.)
कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा बाजारात दबदबा?
ऑगस्ट 2026 मधील विक्रीचे आकडे पाहिल्यास टॉप ब्रँड्सची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
| ई-स्कूटर मॉडेल | ऑगस्ट २०२६ विक्री (युनिट्स) |
| Bajaj Chetak | ५२,२४८ |
| TVS iQube | ४२,८८२ |
| Hero Vida (V2 & VX2) | २५,५५८ |
| Ather Rizta | २२,५८६ |
| TVS Orbiter | १४,६४१ |
हेही वाचा: TATA च्या सर्व इलेक्ट्रिक कार झाल्या स्वस्त! अवघ्या ₹4.69 लाखांत खरेदीची संधी; पाहा काय आहे नवीन BaaS मॉडेल?.
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, Hero Vida ने Ather Rizta सारख्या लोकप्रिय फॅमिली स्कूटरलाही मागे टाकत टॉप-३ मध्ये आपली जागा पक्की केली आहे.
Hero MotoCorp चा ब्रँड ट्रस्ट कमी रनिंग कॉस्ट आणि ९३ किमीपर्यंतची क्लेम्ड रेंज पाहता Vida VX2 Go कडे बजेट इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे.

