महाराष्ट्रात सध्या दुपारी ऑक्टोबर हीटचा चांगलाच चटका बसतोय आणि संध्याकाळ झाली की अचानक ढग दाटून विजांसह पावसाची सर येतेय. हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भ-मराठवाड्यापासून खाली कर्नाटकापर्यंत आणि मध्य महाराष्ट्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या हवामान प्रणालीमुळे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशा दिवसांत रोज इलेक्ट्रिक स्कूटर किंवा कार घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक असते—अचानक पाऊस सुरू झाला, रस्त्यावर पाणी साचल किंवा विजा चमकत असताना चार्जिंग लावायची वेळ आली, तर काही धोका होईल का?
खर सांगायच तर पाऊस पडतोय म्हणून गाडी घरातच ठेवून द्यायची काही गरज नाही. पण विजेवर चालणार वाहन असल्यामुळे काही साध्या गोष्टी समजून घेतल्या, तर ऐनवेळी होणारा नाहक त्रास आणि खर्चाचा भुर्दंड नक्कीच टाळता येतो.
आज अशाच काही अगदी सोप्या आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
१. साचलेल्या पाण्यातून गाडी घालताना घाई करू नका
रस्त्यावर खड्डा किती खोल आहे आणि त्यात पाणी कुठवर साचलय याचा अंदाज येत नसेल, तर गाडी सरळ पुढे नेण्याची चूक करू नका. आजकालच्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बॅटरी आणि मोटर पूर्णपणे सील असतात, हे खर आहे. पण म्हणून ती बोट नाही. जर पाणी वाहत्या वेगाने असेल किंवा चाक अर्ध्याहून जास्त बुडत असतील, तर पेट्रोल गाडी असो वा ईव्ही, तिथेच थांबण चांगल. आपल्या गाडीच्या पुस्तिकेत (Owner’s Manual) कंपनीने पाणी कुठवर चालू शकत याची मर्यादा दिलेली असते, ती एकदा नक्की तपासा.
२. चार्जिंग करताना ओलावा अजिबात चालणार नाही
पावसाळ्यात सगळ्यात जास्त सांभाळायची गोष्ट म्हणजे चार्जिंग. चार्जरची पिन, केबल किंवा गाडीचा सॉकेट ओला असेल, तर लगेच चार्जिंग सुरू करण्याची घाई करू नका. पिन लावण्याआधी ती नीट कोरडी आहे ना हे पाहून घ्या. जर घरात गाडी चार्ज करत असाल, तर सॉकेट अशा ठिकाणी असायला हव जिथ पावसाच पाणी थेट उडत नाही. करंट आणि पाणी यांचा संबंध कधीही चांगला नसतो, एवढ लक्षात ठेवल तरी पुरे.
३. आकाशात जास्त विजा चमकत असतील तर चार्जिंग बंद करा
विजांचा कडकडाट होत असताना उघड्यावर किंवा घराबाहेर गाडी चार्जिंगला लावण टाळलेल बर. विजा पडताना मेन लाईनमध्ये व्होल्टेजचा अचानक झटका (Power Surge) येण्याची शक्यता असते. जर गाडीत आधीच ४०-५०% चार्जिंग शिल्लक असेल आणि लगेच कुठे लांब जायच नसेल, तर विजांचा कडकडाट/वादळ शांत होईपर्यंत थांबा. बाहेरच्या पब्लिक चार्जिंग स्टेशनवर असाल आणि वादळ सुरू झाल, तर तिथे उघड्यावर थांबण्यापेक्षा आधी गाडी बाजूला लावून सुरक्षित आडोशाला जा.
४. सॉकेट किंवा पिन ओला असेल तर गडबड करू नका
पावसातून भिजत आल्यावर लगेच चार्जरची पिन गाडीच्या सॉकेटमध्ये ढकलू नका. जर पोर्टमध्ये पाण्याचे थेंब दिसत असतील, तर थोडा वेळ थांबा किंवा कोरड्या कापडाने हलक्या हाताने स्वच्छ करा. ओल्या सॉकेटमध्ये पिन जबरदस्तीने बसवली आणि करंट सुरू झाला, तर गाडीची सेफ्टी सिस्टीम चार्जिंग बंद पाडेल किंवा सॉकेट शॉर्ट होण्याची भीती असते.
५. पावसात रेंज थोडी कमी वाटली तर घाबरू नका
पावसाच्या दिवसांत गाडी नेहमीपेक्षा कमी पळतेय किंवा बॅटरीची टक्केवारी झपाट्याने खाली येतेय, अस बऱ्याच जणांना वाटत. मग लगेच “बॅटरी उतरली की काय?” असा संशय येतो. पण तस काही नसत. पावसात रस्ते निसरडे असतात, वारंवार ब्रेक मारावे लागतात, खड्ड्यांमुळे वेग कमी-जास्त होतो आणि कार असेल तर वायपर-एसी सतत सुरू असतो. या सगळ्यामुळे गाडीची बॅटरी जास्त खर्च होते. रस्ते कोरडे आणि वातावरण सामान्य झाल की तुमची गाडी पुन्हा पहिल्यासारखीच नेहमीची रेंज द्यायला लागते.
६. रात्री गाडी पार्क कुठे करताय?
पाऊस आणि वादळी वारा असताना झाडांखाली, जुन्या पत्र्यांच्या शेडखाली किंवा जिथ पाणी साचून डबक होत अशा सखल भागात गाडी उभी करू नका. रात्री गाडी पार्क करताना एवढच बघा:
- पार्किंगच्या जागी पाणी तुंबणार नाही ना?
- घरात लावणारा पोर्टेबल चार्जर जमिनीवरच्या पाण्यात पडणार नाही ना?
- शक्यतो वर छत असलेल्या कोरड्या जागेत गाडी लावा.
७. गाडीच मॅन्युअल एकदा वाचा
बाजारात ओला, एथर, टीव्हीएस, बजाज सगळ्यांच्या गाड्यांची रचना वेगळी आहे. कोणाची बॅटरी खाली असते, तर कोणाची सीटखाली. त्यामुळे मित्राच्या गाडीला काही झाल नाही म्हणून आपल्याही गाडीला काही होणार नाही, अस समजू नका. गाडी घेताना जे पुस्तक मिळत, त्यात पावसात गाडी कशी हाताळावी याच्या स्पष्ट सूचना असतात. व्हॉट्सॲपवरच्या मेसेजपेक्षा कंपनीने मॅन्युअलमध्ये जे लिहिलय त्यावर जास्त विश्वास ठेवा.
थोडक्यात समजून घ्यायच तर: इलेक्ट्रिक वाहनांना पावसाच काही वावड नसत. कंपन्यांनी बॅटरी आणि मोटर व्यवस्थित पॅक केलेली असते. फक्त आपण पाणी साचलेल्या रस्त्यांवर उगाच रिस्क घ्यायची नाही आणि चार्जिंग करताना ओलावा टाळायचा. एवढी साधी काळजी घेतली तरी पावसाळ्यात ईव्ही चालवणं अजिबात डोकेदुखी ठरत नाही.

