161 किमी रेंज 10 मिनिटांत 30 किमीचे फास्ट चार्जिंग; Rizta S आणि Z व्हेरिएंटमधील फरक, किंमत आणि बॅटरी वॉरंटीचे सत्य जाणून घ्या

Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटरचे प्रातिनिधिक छायाचित्र

आतापर्यंत भारतीय रस्त्यांवर एथर (Ather Energy) म्हटल की तरुणाईला वेड लावणारी, वेगात पळणारी 450X ही स्पोर्टी स्कूटर डोळ्यांसमोर यायची. मात्र, सामान्य भारतीय कुटुंबाच्या गरजा पूर्णपणे वेगळ्या असतात—त्यांना हवी असते लांब सीट, भरपूर सामान ठेवण्यासाठी जागा आणि सर्वांना चालवता येईल असा शांत, सुरक्षित अनुभव! नेमकी हीच गरज ओळखून एथरने बाजारात आणलेली ‘Ather Rizta’ सध्या फॅमिली ई-स्कूटर सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालत आहे.

एका चार्जमध्ये १६१ किलोमीटरपर्यंतची रेंज, लांब सीट, ५६ लिटरची एकूण स्टोरेज क्षमता आणि एथरच्या सुपरफास्ट चार्जिंग नेटवर्कचे पाठबळ यामुळे रिझ्टा ही कौटुंबिक वापरासाठी एक अव्वल पर्याय म्हणून पुढे येत आहे.

रेंजचे तीन पर्याय आणि ११० मिनिटांत ३० किमीचा फास्ट चार्ज!

ग्राहकांच्या रोजच्या फिरण्यानुसार एथरने यात २.७ kWh, २.९ kWh आणि ३.५ kWh अशा तीन वेगवेगळ्या बॅटरींचे पर्याय दिले आहेत:

  • लहान बॅटरीसह ही स्कूटर १२३ किमीची प्रमाणित IDC रेंज देते.
  • मोठ्या ३.५ kWh बॅटरी पॅकसह एका चार्जमध्ये १६१ किमीची IDC रेंज मिळते.

या स्कूटरमध्ये ४.३ kW ची पीक पॉवर आणि २२ Nm चा टॉर्क देणारी कार्यक्षम PMSM मोटर बसवण्यात आली आहे, ज्यामुळे ही गाडी ताशी ८० किमीचा टॉप स्पीड सहज गाठते. अवघ्या ४.७ सेकंदात ० ते ४० चा वेग पकडणारी ही गाडी ओव्हरटेकिंगसाठी उत्तम ठरते.

लांब पल्ल्याच्या प्रवासात चार्जिंगची भीती राहू नये म्हणून एथरचे भव्य ‘Ather Grid’ फास्ट चार्जिंग नेटवर्क पाठीशी उभे आहे. Rizta Z च्या मोठ्या बॅटरी व्हेरियंटला फास्ट चार्जरवर लावले, तर अवघ्या १० मिनिटांत ३० किमी धावण्याइतकी बॅटरी चार्ज होते! तर घरी सामान्य प्लगवर चार्ज करण्यासाठी बॅटरीच्या आकारानुसार ३ ते ६ तासांचा वेळ लागतो.

३४ लिटरची मोठी डिकी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आरामदायी सीट

पारंपरिक स्कूटर्समध्ये सामान ठेवताना नेहमीच अडचण होते. मात्र Rizta मध्ये सीटखाली ३४ लिटरची बूट स्पेस दिली आहे, ज्यामध्ये दोन हेल्मेट किंवा समानाच्या पिशव्या सहज बसतात. याशिवाय पुढील बाजूची जागा आणि अतिरिक्त ॲक्सेसरीज मिळून ५६ लिटरपर्यंतची एकूण स्टोरेज जागा तयार होते.

यात दिलेली सीट आकाराने इतकी रुंद आणि लांब आहे की, दोन प्रौढ व्यक्ती आणि लहान मूल आरामात बसू शकतात. मागील प्रवाशासाठी आरामदायी बॅकरेस्ट (Backrest) देखील उपलब्ध आहे.

Rizta S की Rizta Z: तुमच्यासाठी कोणता व्हेरियंट योग्य?

एथरने ही फॅमिली स्कूटर प्रामुख्याने दोन व्हेरियंट्समध्ये आणली आहे:

  • Rizta S (सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹१,२१,९९९): ज्यांचे बजेट थोडे मर्यादित आहे त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. यात ७ इंचाचा डीप-व्ह्यू (DeepView) डिजिटल डिस्प्ले, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ऑटो-होल्ड आणि रिव्हर्स मोड मिळतात.
  • Rizta Z (सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹१,३६,९९९): हा टॉप-एंड लक्झरी प्रकार आहे. यामध्ये ७ इंचाची संपूर्ण रंगीत TFT टचस्क्रीन, Google Maps, चिखलात गाडी घसरू नये म्हणून ‘SkidControl’, आणि ब्रेक न दाबता केवळ एक्सलेटर उलट फिरवून गाडी थांबवणारे ‘Magic Twist’ फिचर मिळते.

सुरक्षेसाठी दोन्ही मॉडेल्समध्ये पुढील चाकात २०० मिमीचा डिस्क ब्रेक, कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीम (CBS), इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि गाडी पडल्यास मोटर तत्काळ बंद करणारी ‘FallSafe’ टेक्नॉलॉजी दिली आहे.

१० वर्षांची बॅटरी वॉरंटी: नेमके सत्य काय?

अनेकदा जाहिरातींमध्ये “१० वर्षांची बॅटरी वॉरंटी” पाहून ग्राहक भुलतात. पण येथे एक तांत्रिक फरक समजून घेणे आवश्यक आहे.

कंपनीकडून Rizta सोबत मिळणारी नियमित स्टँडर्ड वॉरंटी ही ३ वर्षे किंवा ३०,००० किमीची असते. १० वर्षे किंवा १ लाख किमीचे कव्हरेज हे कंपनीच्या अतिरिक्त वॉरंटी प्रोग्रामचा (Extended Warranty) भाग आहे. या विशेष प्लॅनमध्ये १० वर्षांपर्यंत बॅटरीचे आरोग्य (Health) किमान ७० टक्क्यांपेक्षा जास्त टिकून राहण्याची अधिकृत हमी दिली जाते. त्यामुळे खरेदी करताना डीलरकडून या प्लॅनच्या अटी समजून घेणे गेजेजेचे आहे.

हेही वाचा: Bajaj Chetak ची 5 नवी मॉडेल्स! ₹95,802 पासून किंमत आणि 153 किमी रेंज; तुमच्या बजेटमध्ये कोणती बसेल?.

Ather Rizta S ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹१,२१,९९९ आणि Rizta Z ची किंमत ₹१,३६,९९९ पासून सुरू होते.

Share This Article